Pune Accident : पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर बोरघाट पोलीस चौकीजवळ भीषण अपघात; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज : पुणे- एक्सप्रेस वे वर आज सकाळी बोरघाट (Pune Accident) पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामधील एक ट्रक काचवाहू होता. या ट्रकमधील काचा अपघातानंतर रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व अवजड वाहने जागोजागी थांबवून ठेवण्यात आली असून हलकी वाहने खोपोली शहरांमधून जुन्या राष्ट्रीय महामार्गाने वळवण्यात आली आहेत. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजतात बोरघाट महामार्ग पोलीस, आय आर (Pune Accident) बी, देवदूत यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली असून क्रेनच्या सहाय्याने सदर अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.

सोबतच रस्त्यावर पसरलेल्या काचा यादेखील बाजूला कराव्या लागणार आहेत. अन्यथा त्यावरून वाहने जाऊन वाहनांचे टायर पंक्चर होण्याचे व फुटण्याची शक्यता आहे.

वरसोली टोल नाका व वलवण गावाजवळ अवजड वाहने थांबून ठेवल्याने जुन्या राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.