Pune accident: भरधाव पीएमपीएमएलची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज: भरधाव वेगात जाणाऱ्या एका पीएमपीएमएलने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. (Pune accident) खडकवासला परिसरातील बहुली रस्त्यावर गुरुवारी हा अपघात झाला. शंकर बबन काळे (वय 31) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी बस चालक कमलाकर पांडुरंग शेवाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत शंकर काळे हे दुचाकीने जात होते. त्याच वेळी आगळंबे गावाकडून मार्केट यार्ड च्या दिशेने जाणारी पीएमपीएमएलची बस येत होती. (Pune accident) भरधाव वेगात येणाऱ्या या बसने शंकर काळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. समोरासमोर धडक झाल्याने शंकर काळे हे गंभीररित्या जखमी झाले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने काळे यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता.

Pune Sex racket: एक्स्ट्रा सर्विसच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट उध्वस्त

या घटनेनंतर उत्तम नगर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे बस चालवून दुचाकी स्वराच्या मृत्यूला जबाबदार धरत बस चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Pune accident)  मयत काळे हे मार्केट यार्ड परिसरात हमालीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.