Pune: भाजपच्या टिकेनंतर राष्ट्रवादीने ‘ते’ पत्रक घेतले मागे

Pune: After BJP's criticism, NCP withdrew 'that' letter 11 हजार रुपये भरा आणि ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा

एमपीसी न्यूज – कोरोनाचे कारण पुढे करून ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकाने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रक काढून ज्या कार्यकर्त्यांना प्रशासक व्हायचे आहे, त्यांनी 11 हजार रुपये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यावर जमा करावे, असे आदेश दिले होते. त्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली होती. प्रसारमध्यमांनीही हा विषय लावून धरला त्यानंतर तातडीने हे पत्रक मागे घेण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींच्या इच्छुकांकडून ही रक्कम वसूल करण्यात येणार होती. राज्यातील जुलै आणि डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी प्रसिद्ध केलेल्या पत्रावर निलेश राणे यांनी जोरदार टीका केली. काही पक्ष मिळेल तिथून पैसे खायला विसरत नाही. 11 हजार द्या आणि प्रशासक व्हावा, जो पैसे देऊन प्रशासक झालाय तो पैसे कमवायला हातपाय मरणारच आणि स्वतःचच चालवणार, पक्षाचे पक्षाचे कार्यकर्ते प्रशासक झाले की, गावाची वाट लावणार, अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवरून  हल्लाबोल केला होता.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीच्या निर्णयाला विरोध केला आहे. लोकशाही नष्ट करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.