Pune : मानवी बुद्धीमत्तेच्या जवळपासही कृत्रिम बुद्धीमत्ता नाही – डाॅ. विवेक सावंत

एमपीसी न्यूज -मानवी शरीरात अनेक गुणधर्म आहेत. अनुभव घेता येणे, योग्य ( Pune)  अयोग्य ठरवणे, स्वप्न, कल्पना, भावना, प्रेम, सहवेदना हे माणसाच्या बुद्धीमत्तेची वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये कृत्रिम बुद्धीमत्तेत नाहीत. त्यामुळे मानवी बुद्धीमत्तेच्या जवळपासही कृत्रिम बुद्धीमत्ता नाही. असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अध्यक्ष आणि संगणकतज्ज्ञ डाॅ. विवेक सावंत यांनी केले.

Pune : ‘कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर’ असे म्हणत पुणे अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने अनंत व्याख्यानमालेत भागीदारी- मानवी आणि कृत्रिम बुद्धीमत्तांची” या विषयावर डाॅ. सावंत बोलत होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते.

Kondhwa : कौसर बाग येथे भंगार मालाच्या गोडाऊनला व गॅरेजला आग

डाॅ. सावंत पुढे म्हणाले की कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे नवीन तंत्रज्ञान, संशोधन सार्वत्रिक, कमी किंमतीत, मोठ्या क्षमतेने, समानतेच्या पातळीवर विकसित होत आहेत. आज विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमतेचा वापर वेगाने सुरू आहे. शिक्षण, व्यापार, वैद्यकीय,पर्यटन, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला जात आहे.

मोठ्या प्रमाणात रोज नवनवीन ॲप्स येत आहेत. सत्तावीस लाखापेक्षा जास्त ॲप्स जगभरात वापरले जातात. माणसाचे यंत्र होऊ नये आणि यंत्रांचा माणूस होऊ नये. मानवी व कृत्रिम बुद्धिमत्ता एकमेकांचे नाहीत असं मानून दोघांच्या भागीदारीतून माणसाची प्रगती करण्याचा विचार करायला हवा.

मानवाचे अस्तित्व आजही टिकून आहे याचं कारण भाषा हे आहे. आज भाषेला मर्यादा नाही. कोणती तरी एक भाषा आली पाहिजे. क्षणात भाषांतराची सोय उपलब्ध आहे. मराठी भाषेचा बिनधास्तपणे वापर करा इंग्रजी भाषेचे मंडलिकत्व स्वीकारायची गरज नाही. असेही डाॅ. सावंत म्हणाले.

प्रास्ताविक मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी केले. ते म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणात नव्या तंत्रज्ञानाला महत्वाचे स्थान निर्माण झाले आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना अनेकसंधी उपलब्ध झाल्या आहेत. सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर, अमृता खराडे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ.चासकर यांनी मानले.

संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम अभंग, किरण देशपांडे, संतोष पठारे, आदिनाथ पाठक, गोरख सोंडकर यांनी या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम ( Pune) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.