Pune : कारखाना सुरू करून बिडी कामगारांना रोजगार द्यावा ; भारतीय मजदूर संघाची मागणी

एमपीसी न्यूज – पुण्यातील ठाकुर सावदेकर आणि कंपनी मध्ये (Pune)  गेल्या 100 वर्षा पासून बिडी बनवण्याचे काम चालते,  या ठिकाणी महिला कामगार कार्यरत आहेत.  हा कारखाना दि 25 जुलै 2023 पासून कोणतेही नोटीस न देता बेकायदेशीर पणे बंद करण्यात आला. कारखान्यातील  कामगारांना त्वरित काम देवून रोजगार त्वरित सुरू करावा अन्यथा मालकाच्या घरी उपोषण करावे लागेल असा  ईशारा भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी भवानी पेठ कारखान्या  समोर झालेल्या निदर्शने च्या वेळी दिलेला आहे .

या वेळी महाराष्ट्र राज्य बीडी कामगार संघांचे सरचिटणीस उमेश विस्वाद,  अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे उपस्थित होते.

यावेळी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.या कंपनीची नाना पेठ शाखा  25 जुलै रोजी बेकायदेशीर पणे कोणतेही नोटीस न देता बंद केली आहे.  बीडी कामगारांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.  त्यामुळे त्वरित कारखाना सुरू करून बिडी कामगारांना रोजगार द्यावा या मागणीसाठी निदर्शने चालू झाली आहे.

Pune : मानवी बुद्धीमत्तेच्या जवळपासही कृत्रिम बुद्धीमत्ता नाही – डाॅ. विवेक सावंत

या बाबतीत भारतीय मजदूर संघाने मा कामगार उपायुक्त पुणे यांच्या कडे तक्रारी दाखल केल्या आहेत,  या बाबतीत दि 26 /7/2023 रोजी सहाय्यक एन ए वाळके  कामगार आयुक्त  यांनी त्रिपक्षीय बैठक घेवून कामगारांची भूमिका समजून घेवून कारखाना सुरू ठेवण्यासाठी सूचना दिल्या होत्या.  पण याचे पालन ही व्यवस्थापनाने  केले नाही.

या  कंपनीने भविष्य निर्वाह निधी चे अंशदान रक्कम जमा केली नाही त्यामुळे कार्यालयाने 17 लाख रू त्वरित जमा करण्या चे दिले आदेश देण्यात आले आहेत.याच्या  आकसामुळेच कारखाना बंद करून कामगारांवर दबाव आणण्यासाठीच व्यवस्थापनाने केला आहे पण संघटना व कामगार कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही असे मनोगत महाराष्ट्र राज्य बीडी कामगार संघांचे महामंत्री उमेश विस्वाद यांनी निदर्शनाच्या वेळी सांगितले आहे.

या वेळी भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे, बीडी महासंघाचे उमेश विस्वाद,  पार्वती अंकम,  विजया झंपाल,  वासंती तुम्मा,  वैशाली शिरापुरी,  सुशीला उरडी,  संजना भुस्सा यांनी नेतृत्व (Pune) केले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.