RSS: ..जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक एका सर्वसामान्य स्वयंसेवकाच्या घरी दोन तास रमतात!

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) म्हटले की सर्वांना स्वयंसेवकांची शिस्त आठवते. संघटनेत काम करताना संघटनेतील सर्वोच्च व्यक्ती आपल्या घरी यावी अशी सर्वांची इच्छा असते. सर्वोच्च व्यक्ती घरी आल्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. तसाच अनुभव पिंपरीतील संत तुकारामनगर येथील स्वयंसेवक संदीप जाधव यांना आला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. दोन तास ते त्यांच्या घरी रमले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. संघटनेचे लाखो स्वयंसेवक आहेत. नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात.

मदतीसाठी सर्वात पुढे असतात. संत तुकारामनगर येथील संदीप जाधव हे अनेक वर्षांपासून संघ स्वयंसेवक आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात ते संघाचे कार्य करतात. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच (५ जुलै) रोजी जाधव यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

अनौपचारिकपणे सरसंघचालक हे जाधव यांच्या (RSS) घरी आले. सरसंघचालक भागवत यांनी जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आपुलकीने संवाद साधला. त्यामुळे जाधव कुटूंबीय आनंदाने हरखून गेले.

Pune : कारखाना सुरू करून बिडी कामगारांना रोजगार द्यावा ; भारतीय मजदूर संघाची मागणी

अमृतानुभुव…!

एका सामान्य संघ कार्यकर्त्यांच्या घरी संघाच्या कुटुंब प्रमुखाने अगदी निर्हेतुक येणे. घरच्या सर्वांशी मनमोकळी चर्चा करणे, कुठेही एक असामान्य व्यक्तिमत्व घरी आल्याची जाणीव होऊ न देण, घरी बनविलेल साधसुध जेवण सर्वासोबत घेण. हे सर्व अचंबित करणार आहे, कल्पनेपलीकडच आहे.

याचाच अनुभव आम्हा जाधव कुटुबियांना 5  जुलै रोजी आला. निमित्त होत प.पु .सरसंघचालकांच आमच्या घरी अनौपचारिक येण.त्या मंतरलेल्या दोन तासांच्या सहवासामधून आम्ही सर्व कुटुंबीय अजुनही बाहेर पडलेलो नाही. आणि पडणार ही नाही. भविष्यात संघकामात सतत कार्यरत रहाण्यासाठी आवश्यक ती सर्व उर्जा वेचण्याचा आटोकाट प्रयत्न मी तरी केला आहे. आणि हेच संचित मला आयुष्यभर पुरेल अशी पोस्ट संदीप जाधव यांनी आपल्या फेसबुक खात्यावर टाकली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.