Pune : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या जून अखेरीस 23 हजारांपर्यंत वाढण्याचा ‘स्मार्ट सिटी’चा अंदाज

As many as 22,000 corona patients in the city at the end of June; Smart City forecast

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सध्या कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. रोज 200 नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जूनच्या शेवटी तब्बल 22 हजार 940 कोरोना रुग्ण होतील, असा अंदाज ‘स्मार्ट सिटी वॉर रुम’च्या अहवालात म्हटले आहे.

पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची दुप्पट संख्या 14 दिवसांवर आली आहे. पुणे महापालिकेतर्फे यापूर्वी मे अखेरीस 5 हजार कोरोना रुग्ण शहरात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो खरा ठरून 5 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण होण्याची भीती आहे.

तर, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी तर मे अखेरीस 10 हजार रुग्ण होणार असल्याचे म्हटले होते. त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे ही संख्या आटोक्यात आली. पुणे महापालिकेने 22 हजार रुग्णसंख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन असलेले बेडस, आयसीयू बेडस, आणि व्हेंटिलेटरसचा आढावा घेणे सुरू केले आहे. त्यात 487 आयसीयू बेडस व 244 व्हेंटिलेटरची गरज लागणार आहे. पुण्यात जवळपास 90 टक्के भाग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

कोरोनामुळे रविवारीही 7 जणांचा मृत्यू झाला असून 77 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनाचे 179 नवीन रुग्ण आढळले. पुण्यातील मृतांचा आकडा 255 वर गेला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्ण 4782 असून यातील बरे झालेले रुग्णसंख्या 2550 आहेत.

सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1977 आहे. तर, गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांची संख्या 176 आहे. 47 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.