Pune : पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानिमित्त तब्बल 4440 रक्तदात्यांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्हा (Pune) तर्फे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदानमासानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली होती. त्यामधे पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके, शहरे मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यामध्ये एकूण 4,440 जणांनी रक्तदान केले. अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे पुणे जिल्हा प्रमुख संजय जढर यांनी दिली.
Pimpri-Chinchwad : पोटच्या अल्पवयीन मुलाला व भाच्याला मोबाईल चोरी करायला लावणाऱ्या बापाला अटक
पुण्यामधून संभाजी महाराज यांच्या बलिदानाप्रति असलेली आस्था व जाणीवेतून कर्तव्य समजून सर्व रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला व सहकार्य केले. पुढील वर्षी होणाऱ्या रक्तदान शिबिरात (Pune) पुणे जिल्ह्यातील 13 तालुके आणि 2 महानगरे प्रत्येकी अशी हजार रक्तदान पार पाडेल असा संकल्प यावेळी करण्यात आला.