Pune: जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त मंगळवारी (दि १० डिसेंबर) उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या वतीने अध्यक्ष विकास कुचेकर यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, शुक्रवार पेठ येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमामध्ये डॉ. सुधाकरराव जाधवर (अध्यक्ष, जाधवर ग्रुप) यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. अभिनंदन थोरात (अध्यक्ष चिंतन ग्रुप – राजकीय विश्लेषक), भानुप्रताप बर्गे (माजी. पोलिस उप आयुक्त), पी. सी. भगत (सचिव, पुणे जिल्हा न्याय प्राधिकरण), सर्जेराव बाबर (सहा. पोलिस आयुक्त), अ‍ॅड. शार्दुल जाधवर (उपाध्यक्ष, जाधवर ग्रुप – सल्लागार मानवी हक्क संरक्षण व जागृती), अ‍ॅड. सचिन झालटे – पाटील (सल्लागार मानवी हक्क संरक्षण व जागृती), विजय बहाळकर (अध्यक्ष, टी डी एफ महाराष्ट्र राज्य) हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते तसेच, अंबरनाथ कांबळे (नगरसेवक, ह प्रभाग अध्यक्ष पिंपरी-चिंचवड), सचिन दुर्गाडे (अध्यक्ष, टी डी एफ, पुणे शहर), शरदचंद्र धारुरकर (अध्यक्ष, शारिरीक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य), प्रा. जी. के. थोरात (अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ, पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. मनोहर जाधव (साहित्य), प्रा. फुलचंद चाटे (शैक्षणिक), संदीप बर्वे (सामजिक), सुनील जगताप (पत्रकारीता) यांना मानव अधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच, विशेष कार्य मानव अधिकार या पुरस्काराने आकाश भोसले (पत्रकारीता) यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, संविधान ग्रंथ, शाल व श्रीफळ असे होते.

या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धायरी येथे ८ डिसेंबरला राबविल्या होत्या. वक्तृत्व स्पर्धेचा विषय मानवी हक्क संरक्षण व संवर्धन हा होता. या वक्तृत्व स्पर्धेत यशवंत खाडे (प्रथम क्रमांक), पराग बधिरके (द्वितीय क्रमांक), आरुषी पटीयाल (तृतीय क्रमांक) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.

संस्थेच्या वतीने शिक्षण हक्क कायद्याची जनजागृती करीत असताना यात शिक्षकांचीही महत्वपूर्ण भूमिका राहिल्याने विद्यार्थी घडविणाऱ्या गुणवंत शिक्षकांचाही शिक्षक लोकशाही आघाडी संघटनेच्या वतीने सुचविण्यात आलेल्या शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.