Pune : मुलाला सोडण्यासाठी 25 लाखाची मागणी; तक्रार देऊन वर्ष झाले तरी पोलिसांकडून शोध सुरुच

एमपीसी न्यूज – मुलाला सोडण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी करणारा फोन येतोय. मात्र, तक्रार देऊन वर्ष झाले तरी पोलिसांकडून शोध सुरु आहे, असे  अपहरण झालेल्या मुलाच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.

आकाश भानुदास खुटवड असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, याबाबत भानुदास खुटवड (रा. सहकारनगर, मूळ रा. नायगाव, ता. भोर) यांनी रीतसर धनकवडी पोलिसांत तक्रातही दाखल केली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकत असलेला आकाश २ जानेवारी २०१९ रोजी घर सोडून गेला. आता त्याच्या कुटुंबियांना ’25 लाख द्या, मुलाला सोडतो,’ असा एकजण फोन करून पैशाची मागणी करत आहे. हा फोन पोलिसांसमोर रोकॉर्डही झाला आहे. याबाबत मुलाच्या कुटुंबियांनी रीतसर धनकवडी पोलिसांत तक्रातही दाखल केली आहे. आता एक वर्ष होत आलं तरी पोलिसांकडून शोध सुरु आहे, असे सांगण्यात येत असल्याचे भानुदास खुटवड यांचा म्हणणं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.