Pune : शिवकुमार शर्मा ,शौनक अभिषेकी यांच्यासमवेत पुण्यात शनिवारी ‘बरखा ऋतू’ उत्सव

'बनयान ट्री ' संस्थेतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज- ‘बनयान ट्री ‘ संस्थेतर्फे शिवकुमार शर्मा ,शौनक अभिषेकी यांच्यासमवेत मैफलीच्या ‘बरखा ऋतू ‘संगीत उत्सवाचें आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी (दि.२०) जुलै रोजी(शनिवार) सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. वर्षाऋतू कालीन रागांची ही मैफल असून आषाढसरींच्या साथीने संगीतरसिकांसाठी पर्वणी आहे.

मागील १८ वर्षांपासून ‘बनयान ट्री ‘ संस्थेतर्फे ‘बरखा ऋतू ‘ महोत्सव दरवर्षी विविध शहरात दिग्गज कलाकारांसमवेत आयोजित केला जातो. यावर्षी पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा (संतूरवादन) आणि शौनक अभिषेकी ( गायन ) अशी ही मैफल रंगणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.