Pune : विद्या अभिषेकी यांचे निधन

एमपीसी न्यूज – ख्यातनाम गायक व संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या मातोश्री विद्या जितेंद्र अभिषेकी यांचे पुण्यामध्ये वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Pune) त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगी मेखला,  मुलगा पं. शौनक अभिषेकी, जावई योगेश खडीकर, सून रश्मी अभिषेकी, अभेद व सांजली ही नातवंडे आणि मोठ्या संख्येने शिष्य परिवार आहे.

 महाराष्ट्राचे चॅरीटी कमिशनर कै. चंद्रकांत गोडसे यांच्या त्या कन्या होत्या. विद्या अभिषेकी ह्यांचे मूळ गाव  तसे बीड होते  पण त्यांच्या वडिलांची सतत बदली होत राहिल्यामुळे त्या हैद्राबाद , मुंबई अशा ठिकाणी वास्तव्यास होत्या. पुढे त्यांनी समाजशास्त्र विषयात पदवी घेऊन लंडन येथे जाऊन पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.  साल 1969 मध्ये प्रसिद्ध गायक  पंडित जितेंद्र अभिषेकी (Pune) यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या.

अभिषेकी बुवांच्या संगीत कार्याला आपलं आयुष्य त्यांनी जणू समर्पित केले. गुरुकुलाची  सर्व जबाबदारी विद्या अभिषेकी यांनी मनोमन स्विकारली आणि  यशस्वीरीत्या हाताळली.     शौनक अभिषेकी आणि बुवांच्या सर्वच शिष्यांच्या कलाकार म्हणून झालेल्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.