Nigdi : कंपनीला जागा देण्याच्या बहाण्याने 1 कोटी 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  जे. आर. एल. रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर  कंपनीला (Nigdi)  जागा देण्याच्या बहाण्याने 1 कोटी 20 लाख रुपये घेत  ठरल्याप्रमाणे कंपनीला जागा न देता फसवणूक केली. हा प्रकार 10 जानेवारी ते 3 एप्रिल या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला.
प्रसाद प्रदीप कोंडे देशमुख (रा. धनकवडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 Pune : प्रसिद्ध दिवंगत गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या पत्नी विद्या अभिषेकी यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जे. आर. एल. रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला जागा हवी असल्याने फिर्यादी जागेचा शोध घेत होत्या. त्यावेळी आरोपीकडे 15 गुंठे (Nigdi)  जागा असून त्या जागेची किंमत 3 कोटी 90 लाख रुपये ठरवण्यात आली.  त्यानंतर 30 टक्के रक्कम घेऊन इसार पावती करून देतो असे आरोपीने सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी आरटीजीएस द्वारे आरोपीला 1 कोटी 20 लाख रुपये दिले. पैसे घेतल्यानंतरही इसार पावती करून न देता तसेच घेतलेले पैसे परत न देता फिर्यादीची फसवणूक केली.  पुढील तपास निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.