Pune- खड्डे चुकविताना ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्यातील खड्डे चुकविताना गाडी घसरून खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ( दि. 29) रात्री सॅलिसबरी पार्क येथील गिरीधर भवन चौकात घडली.

संदीप वसंतलाल शहा (वय 45 रा. गंगाधाम) असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालक संजय बागल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅलिसबरी पार्क जवळील गिरीधर चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवत असताना शाह यांची दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. या अपघातात शहा यांचा जागीच मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.