Pune : गरजू लोकांना पाच रुपयांत पोळी-भाजी देणार -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – कोथरूड मतदारसंघात गरजू लोकांना केवळ पाच रुपयांत पोळी-भाजी देणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

8262879683 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करावा, त्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत मागणी नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांकवरील व्हॉट्सअप करावे, दुपारी एक वाजेपर्यंत पोळीभाजी गरजू नागरिकांच्या घरी मिळणार आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीच्या जेवणाची मागणी घेण्यात येत आहे. रात्री ९ वाजेपर्यंत घरपोच जेवण देण्यात येणार आहे.

ज्या नागरिकांना औषधांची गरज आहे त्यांना 25% सवलतीच्या दरात घरपोच प्रिस्क्रिप्शन नुसार औषधे देण्यात येणार आहेत. त्यासाठी 9922037062 या मोबाइल क्रमांकावर व्हाट्सअप करावे.

कोरोनाला रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे गोरगरिबांची गैरसोय होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.