Kondhwa : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये -हाजी गफूर पठाण

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ व्हायरस उपाययोजना म्हणून कोंढवा सारख्या गर्दी आणि दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने गाडी आणि स्पीकर लावून दाट आणि गर्दीच्या ठिकाणी व वस्त्त्या वाड्यामध्ये जाऊन घराचे बाहेर पडू नये, म्हणून आवाहन करीत आहेत. हाजी गफूर पठाण हे स्वतः माईकवरून लोकांना स्वच्छता आणि सुरक्षिततेचे आवाहन करीत आहेत.

नागरिकांना सॅनिटायझर (sanitaizer) वापरण्याबरोबराच परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगत आहेत. शिवाय निष्कारण रस्त्यावर थांबणाऱ्यांना, घरी बसण्याची विनंती करून संपूर्ण कोंढवा परिसर ते पिंजून काढीत आहेत. नागरिक आणि महिलांनी दुकानासमोर गर्दी ना करता, टप्याटप्प्याने जीवनावश्यक वस्तू घ्यावे, यासाठी आग्रह करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीत फारच कमी लोक रस्त्यावर येऊन प्रशासनाला मदत करीत आहेत त्यामध्ये पठाण यांचा समावेश होतो.

कोरोना व्हायरस या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हायड्रो क्लोराईड (haydro clorofaid) ची फवारणी केली. अ‍ॅड. हाजी गफूर पठाण स्वतः थांबून निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करून संपूर्ण परिसर स्वच्छ करुन घेत आहे.

या संकटकाळी धैर्याने कार्यरत असलेल्या पुणे मनपा आरोग्य विभाग कर्मचारी आणि अधिकारी यांना स्वतः सामील होऊन मदत करीत आहेत. आतापर्यंत कोंढवा परिसर फवारणीचे काम चालू आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, म्हणून स्वतःच्या खर्चाने गाडी लावून स्वतः लोकांना आवाहन करीत आहेत. त्यामुळे कोंढवा परिसरातील नागरिक रस्त्यावर येण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.