Pune : लॉकडाऊनमुळे काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्याचे ‘कॅपजेमिनी’ला आदेश ; सोमवारी होणार सलोखा बैठक

Capgemini ordered to re-employ employees fired due to lockdown; A reconciliation meeting will be held on Monday:राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सिनेटने याबाबत आवाज उठवत कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती

एमपीसी न्यूज – ‘कॅपजेमिनी’ या अग्रगण्य आयटी कंपनीला लॉकडाऊन दरम्यान काढून टाकलेल्या 300 कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. यासाठी कंपनी पदाधिकारी आणि कामगार संघटना प्रतिनिधी यांच्यात सोमवारी (दि.13) सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

‘कॅपजेमिनी’ या अग्रगण्य आयटी कंपनीने लॉकडाऊन दरम्यान विविध कारणे देत कंपनीच्या तब्बल 300 कर्मचार्‍यांना कामावर काढून टाकले होते. राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सिनेटने याबाबत आवाज उठवत कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, या तक्रारीची दखल घेऊन कामगार आयुक्तांनी त्या 300 कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कंपनी व्यवस्थापन पदाधिकारी आणि कामगार संघटना प्रतिनिधी यांच्यात सोमवारी (दि.13) सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्मचारी सिनेटचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ‘कॅपजेमिनी’ मधील जबरदस्तीने केलेल्या कर्मचारी कपातीबाबात एप्रिल पासून तक्रारी येत होत्या.

कर्मचार्‍यांना कामावरून कमी न करण्याचे आदेश असताना देखील कंपनीने सक्तीने कर्मचार्‍यांचे राजीनामे लिहून घेतले. कोरोना परिस्थितीत या कामगारांना आर्थिक नुकसान व मानसिक त्रास सहन करावा लागला. कामगार आयुक्तांकडे आम्ही याबाबत तक्रार केली व त्यांनी तात्काळ याची दखल घेतली असे सलुजा म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.