Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला पुणे विभागाचा आढावा

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे विभागाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाची सविस्तर माहिती दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगवेळी पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे यांच्यासह इतर विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्हयासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, या संख्येत झालेली वाढ, गंभीर रुग्णांची स्थिती, मृत रुग्णांची माहिती व प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना, शासनाकडून आवश्यक असलेली मदत, ग्रीन झोन क्षेत्रातील उद्योग सुरू करणेबाबतची माहिती याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.