Pune : कसबा मतदारसंघातील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – अखंड हिंदुस्थानातील (Pune) रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा येत्या 22 जानेवारीला रामजन्मभूमी अयोध्या येथे पार पडत आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कसबा मतदारसंघातील विविध मंदिरांमध्ये आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

प्रभाग क्रमांक अठरा मधील बंदिवान मारुती, रविवार पेठ काची आळीतील राम मंदिर व दत्त मंदिर, गुरुवार पेठ येथील राम मंदिर, प्रभाग क्रमांक सतरा मधील नाना पेठ येथील निवडुंगा विठोबा मंदिर, प्रभाग क्रमांक पंधरा मधील चिमण्या गणपती मंदिर आणि द्रविड यांचे महादेव मंदिर आदी मंदिरात जाऊन स्वच्छता केली.

Alandi : सिद्धबेट बंधाऱ्यावरील मुख्य जलवाहिनीला गळती

यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, राजेंद्र काकडे, उमेश चव्हाण, संजय मामा देशमुख, नामदेव माळवदे, सनी पवार, अभिजीत राजपूत, जयदिप शिंदे, माधव साळुंखे, आरती कोंढरे, बापू नाईक, करण देसाई, रोहन ढोले, दिनेश बढाई, विनोद सोनी, बलराम परदेशी राजू थोरात, राहुल कोसंदर, प्रमोद सवणे, मोतीलाल परदेशी, रिजवान खान, सिद्धेश पांडे, उदय लेले तसेच इतर पदाधिकारी (Pune) व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.