Alandi : सिद्धबेट बंधाऱ्यावरील मुख्य जलवाहिनीला गळती

एमपीसी न्यूज : आळंदी येथील सिद्धबेट बंधाऱ्यावरील (Alandi) आळंदी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला काही दिवसांपासून गळती लागल्याचे दिसून येत आहे. या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे. मुख्य जलवाहिनीची ती गळती बंदी होणे आवश्यक आहे. असे यावेळी आळंदीकर नागरिकाने सांगितले.

Alandi : इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सहाव्या दिवशी सुरूच

दिवसेंदिवस हळूहळू गळतीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. पाण्यामुळे लोखंडी पाइपलाइनच्या (Alandi) तेथील भागात गंज चढून गळतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता काहींनी वर्तवली आहे. या मुख्य जलवाहिनीलाच पुढे मोठी गळती लागल्यास आळंदी शहरातील पाणीपुरवठा काही कालावधी करिता ठप्प होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.