Pune: कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, आयुक्तांचे आदेश

Pune: Commissioner vikram kumar orders all officers to make efforts to prevent corona crisis कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत वैद्यकीय सुविधा आणखी सक्षम करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, उपायुक्त, सहाय्यक आरोग्य प्रमुख, विभागीय वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांनी आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या संपूर्ण परिस्थितिचा आढावा घेतला. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी प्रभाग निहाय सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या पुणे शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुक्तांनी विविध सूचना केल्या. पुणे शहरात आता कोरोनाचे रुग्ण 30 हजार 523 झाले आहेत. 19 हजार 570 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. 10 हजार 64 सक्रिय रुग्ण आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोनाच्या टेस्ट मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत वैद्यकीय सुविधा आणखी सक्षम करण्यात येणार आहे.

रुग्णांना बेडस उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. तर, पुणेकरांनीही लॉकडाऊनला स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.