Pune : मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ(Pune) यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून “राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात” या मथळ्याखाली जाहिरात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली.

याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, ” राम मंदिराला निवडणुक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.”

Pune : पुणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृतीवर भर द्या – डॉ. राजेंद्र भोसले

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुरंदरे यांनी मुरलीधर मोहोळ(Pune) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.