Pune : शहरात कोरोनाचे 1213 रुग्ण, 591 जणांना डिस्चार्ज, 33  मृत्यू

Corona 1213 patients in the city, 591 discharged, 33 deaths : शहरातील विविध रुग्णालयात 742 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 98 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या मंगळवारी 6 हजार 567 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1213 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 591 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 33 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरातील विविध रुग्णालयात 742 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 98 जण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरात कोरोनाचे 50 हजार 430 रुग्ण झाले आहेत. 30 हजार 80 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या कोरोनामुळे 1 हजार 215 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 19 हजार 135 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पर्वती दर्शनमधील 60 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, सुखसागर नगरमधील 69 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, पद्मावतीमधील 77 वर्षीय पुरुषाचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 50 वर्षीय पुरुषाचा आणि 55 वर्षीय महिलेचा, धायरीतील 55 वर्षीय पुरुषाचा, एरंडवनेतील 47 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 75 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

धनकवडीतील 60 वर्षीय पुरुषाचा दळवी हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 65 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 65 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, सोमवार पेठेतील 56 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, कोंढवा बुद्रुकमधील 65 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 65 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

औंधमधील 33 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, शिवदर्शनमधील 76 वर्षीय पुरुषाचा, एरंडवनेतील 40 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 59 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, सोमवार पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, येरवड्यातील 61 वर्षीय पुरुषाचा विनोद मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, घोरपडे पेठेतील 87 वर्षीय पुरुषाचा राव नर्सिंग होम हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तर कोथरूडमधील 43 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, इंदिरा नगरमधील 75 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, डेक्कनमधील 73 वर्षीय पुरुषाचा, मार्केटयार्डमधील 41 वर्षीय पुरुषाचा, शुक्रवार पेठेतील 53 वर्षीय महिलेचा, कोंढाव्यातील 70 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 50 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 32 वर्षीय पुरुषाचा, दत्तवाडीतील 35 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, आनंद नगरमधील 64 वर्षीय पुरुषाचा पाटील हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 62 वर्षीय महिलेचा नायडु हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 67 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like