Pune : येरवड्यात कोरोना चाचणी केंद्र सुरू ; अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

Corona test center opens in Yerwada; Inspection by Additional Commissioner

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण पुणे शहरात वाढत आहेत. हे संकट कमी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी, प्रशासन रात्रंदिवस काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर येरवड्यात नुकतेच कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याची अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पाहणी केली.

यावेळी नगरसेवक ऍड. अविनाश साळवे, भारतीय जैन संघटनेचे अमित लुंकड, सहमहापालिका आयुक्त विजय दहिभाते, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय लांडगे, राजेश बनकर, डॉ. रेखा गलांडे, डॉ. माया लोहार, डॉ. धनंजय निल, वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक युनूस शेख व अन्य अधिकारी उपस्थित होते.

क्रांतीवीर वीर लहुजी वस्ताद साळवे हायस्कूलमधील कोरोना चाचणी केंद्र ७ मे रोजी, तर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहातील कोरोना चाचणी केंद्र १८ मे रोजी सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त विजय लांडगे यांनी दिली.

दरम्यान, महापालिकेतर्फे कोरोनाचे कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. त्या भागातील नागरिकांना बाहेर निघण्यास बंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी महापालिकेतर्फे जीवनावश्यक किट देण्यात येत आहे.

पुणे शहरात आता कोरोनाचे 7 हजार 265 रुग्ण झाले आहेत. तर, 361 नागरिकांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यातील कोरोनाचे संकट वाढतच आहे. जास्तीत जास्त कोरोनाच्या टेस्ट करण्यावर प्रशासनातर्फे भर देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दुसरीकडे या रोगातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.