Pune Corona Update: 1412 नागरिक कोरोनामुक्त तर 1522 नवे रुग्ण; 29 जणांचा मृत्यू

Pune Corona Update: 1412 patients corona free while 1522 new patients; 29 dies आतापर्यंत या आजारामुळे 1 हजार 739 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 702 सक्रिय रुग्ण आहेत

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात येत असून, रविवारी तब्बल 1412 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 5 हजार 707 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1522 नवे रुग्ण आढळले. 29 जणांचा मृत्यू झाला. 760 गंभीर रुग्ण असून, त्यात 462 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 74 हजार 98 रुग्ण झाले आहेत. 57 हजार 657 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या आजारामुळे 1 हजार 739 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 702 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

फुरसुंगीतील 61 वर्षीय महिलेचा, शिवाजीनगरमधील 61 वर्षीय पुरुषाचा, मुंढव्यातील 72 वर्षीय महिलेचा, कात्रजमधील 46 वर्षीय पुरुषाचा, मुंढव्यातील 52 वर्षीय महिलेचा, बोपोडीतील 74 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, औंध रोडवरील 68 वर्षीय पुरुषाचा श्री हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 78 वर्षीय पुरुषाचा, गंजपेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा.

हडपसरमधील 64 वर्षीय पुरुषाचा, गुरुवार पेठेतील 57 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 74 वर्षीय पुरुषाचा, पाषाणमधील 78 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 40 वर्षीय पुरुषाचा, ताडीवाला रोडवरील 62 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 85 वर्षीय पुरुषाचा, उत्तमनगरमधील 58 वर्षीय पुरुषाचा.

लोकमान्य नगरमधील 72 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 75 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, शुक्रवार पेठेतील 67 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 85 वर्षीय महिलेचा सना हॉस्पिटलमध्ये, ताडीवाला रोडवरील 56 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, बिबवेवाडीतील 81 वर्षीय पुरुषाचा.

सिंहगड रोडवरील 87 वर्षीय पुरुषाचा चिंतामणी हॉस्पिटलमध्ये, बालाजी नगरमधील 71 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, धानोरी गावातील 69 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये, रास्ता पेठेतील 75 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 82 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 84 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.