Pune corona Update : 1822 नागरिकांची कोरोनावर मात, 781 रुग्ण, 18 जणांचा मृत्यू

कोरोनाचे पुणे शहरात 58 हजार 304 रुग्ण झाले आहेत. : 1822 civilians overcome corona, 781 patients, 18 deaths

एमपीसी न्यूज – पुणे शहरात रोज कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सोमवारी पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज तब्बल 1822 नागरिक ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या 4 हजार 604 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये केवळ 781 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 18 जणांचा मृत्यू झाला. 633 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 389 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 58 हजार 304 रुग्ण झाले आहेत. 39 हजार 939 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 384 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 16 हजार 981 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

शुक्रवार पेठेतील 69 वर्षीय महिलेचा, वारजेतील 69 वर्षीय महिलेचा, सदाशिव पेठेतील 94 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 72 वर्षीय पुरुषाचा, सदाशिव पेठेतील 69 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 70 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 55 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

उंड्री मधील 66 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, कोंढाव्यातील 50 वर्षीय पुरुषाचा, फुरसुंगीतील 58 वर्षीय पुरुषाचा, लोहगावमधील 45 वर्षीय पुरुषाचा, गणेशनगरमधील 65 वर्षीय महिलेचा सासून हॉस्पिटलमध्ये, बालेवाडीतील 80 वर्षीय महिलेचा मीरा हॉस्पिटलमध्ये, ससाणेनगरमधील 71 वर्षीय पुरुषाचा ओ अँड पी हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 61 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, जाधव वस्तीतील 66 वर्षीय महिलेचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये, शनिवार पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 69 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.