Pune Corona Update : धोक्याची घंटा…दिवसभरात 527 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ !

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 527 नवे रुग्ण सापडले. तर 280 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. संथ गतीने रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या तीन महिन्यातील एका दिवसात 500 टप्पा पार करण्याची ही पहिली वेळ आहे.

_MPC_DIR_MPU_II

आज करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 159 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 325 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1 लाख 96 हजार 916 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2399 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4816 रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आकडेवारी नुसार कासवगतीने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे कळकळीचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like