Pune Corona Update: कोरोनाच्या 85 रुग्णांना डिस्चार्ज, 159 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

Pune Corona Update: 85 corona patients discharged, 159 new patients, 8 deaths. शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 हजार 881 तर कोरोनाबाधित मृतांचा आकडा 378 वर

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 85 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 159 नवे रुग्ण आढळले. तर, या रोगामुळे 8 जणांचा मृत्यू झाला. 209 रुग्ण क्रिटिकल असून, 50 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे शहरात 378 जण दगावले आहेत. एकूण 7 हजार 881 रुग्ण झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

सिंहगड रस्त्यावरील 42 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 46 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 45 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 83 वर्षीय पुरुषाचा हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, नारायण पेठेतील 53 वर्षीय महिलेचा पूना हॉस्पिटलमध्ये, भुसावळ तालुक्यातील 37 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, सोलापूर जिल्ह्यातील 48 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

शहरात आतापर्यंत 378 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह, किडनी विकार, हृदय विकार असे अनेक आजार होते. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. या रोगातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता 61 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठेत आता रुग्ण कमी झाले आहे. फिजिकल डिस्टनसिंग महत्वपूर्ण ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी घाबरून जाऊ नये, कारण सध्या कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

या रोगातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांनी कोरोना झाला म्हणूनच घाबरून जाऊ नये, योग्य वेळी उपचार, काळजी घेतली तर कोरोना सुद्धा बरा होऊ शकतो. विशेषतः लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.