Pune Corona Update : शहरात कोरोना रुग्णवाढीचा दर स्थिरावला ; दैनंदिन मृत्यूमुखींची संख्याही घटली !

एमपीसी न्यूज : पुणे शहरात 233 नवे रुग्ण सापडले असून 343 जणांना घरी सोडण्यात आले. शहरात आज 2 रुग्ण दगावले. ही संख्या एकेकाळी दोन आकड्यांच्या घरात होती. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्यामुळे कोरोना रुग्णवाढीचा दर स्थिरावला असून मृत्यूमुखींची संख्याही घटत असल्याचे चित्र आहे.

तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 725 इतकी आल्यामुळे संसर्ग दर स्थिर आहे. आत्तापर्यंत 1 लाख 72 हजार 587 जण कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. आज एकूण 222 रुग्णांची स्थिती गंभीर असून 455 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

तरीही पुणेकरांनी निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना, विविध ठिकाणी वावरताना मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करावे. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी.

तसेच नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.