Pune Corona Update : दिवसभरात 858 रुग्णांना डिस्चार्ज, नवे 384 कोरोनाबाधित

 एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज नव्याने 384  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 70 हजार 311इतकी झाली आहे.

शहरातील 858  कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 56 हजार 509 झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 964  नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25  लाख 02  हजार 701  इतकी झाली आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 28 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8  हजार 284  इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या 5  हजार 518  रुग्णांपैकी 784 रुग्ण गंभीर तर 1,466  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

सलून, पार्लर, स्पा, जिम बंद

पुणे मनपा हद्दीत आपण निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून, पार्लर, स्पा, जिम बंद ठेवण्यात येत आहे. सलून आणि पार्लर सुरु ठेवण्याचा निर्णय आपण स्थानिक पातळीवर घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.