Pune Corona Update : आज 4,789 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 74 मृत्यू, 3,991 नवे रुग्ण

सलग सहाव्या दिवशी नव्या रुग्ण संख्येत घट

एमपीसीन्यूज : पुणे शहरात कोरोना निर्मूलन उपाययोजनांना मोठे यश मिळत असून सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 3,991 नव्या रुग्णांची नोंद झाली तर कोरोनामुक्त झालेल्या 4,789  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनाबाधीत 74 रुग्णांचा आज मृत्यू झाला. यामधील 19 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

आज 22,227 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात 3,991  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरात आजपर्यंत 3,95, 486 एकूण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. आज कोरोनामुक्त झालेल्या 4,789 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत डिस्चार्ज दिलेल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 3,39,571 इतकी झाली आहे.

सध्या 1,364 क्रिटिकल रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आज कोरोनामुळे 74 रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे शहरात कोरोनाने आजपर्यंत 6,443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.