Pune Crime : 24 तासात 3 खून; पुणे शहर हादरले

एमपीसी न्यूज : पुणे शहरात (Pune Crime) मागील 24 तासात वेगवेगळ्या कारणावरून खून झाल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. शहरातील हडपसर, डेक्कन आणि सिंहगड परिसरात या घटना घडल्यात. हे तीनही खून अगदी किरकोळ कारणावरून करण्यात आले. त्यामुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे की काय असा प्रश्न पडला आहे.

शहरातील सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव बुद्रुक परिसरात एका अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आला. मैत्रिणी सोबत गप्पा मारत बसला असताना या तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली आणि मातीची कुंडी मारून त्याचा निर्घृण खून केला. सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी स्वप्निल अंकुश उभे (वय 22) या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

दुसऱ्या एका घटनेत हडपसर परिसरात आर्थिक व्यवहारातून एका रिक्षा चालकाचा खून करण्यात आला. हडपसर येथील माळवाडी परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला. सागर राहुल गायकवाड (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी कृष्णा विठ्ठल रखले (वय 27) याला अटक केली आहे. मयत तरुण आणि आरोपी दोघेही रिक्षा चालक आहेत.

Haveli News : घरगुती सिलेंडरच्या वायू गळतीने घरामधे आग; महिला जखमी.

तिसरी घटना शहराच्या मध्यवस्तीतील (Pune Crime) डेक्कन पोलीस ठाण्याच्या हातीत घडली. शहरातील भिडे पुलाजवळ नदीपात्रात एका तरुणावर धारदार शस्त्र आणि वार करून त्याचा खून करण्यात आला. गणेश सुरेश कदम (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवार पेठ तो लॉन्ड्री चालक म्हणून काम करायचा. पूर्ववैमन्यास्यातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. डेक्कन पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.