Pune Crime : अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली अन् उघडकीस आला धक्कादायक प्रकार

एमपीसी न्यूज : तुझ्यावर माझे प्रेम आहे, असे सांगत (Pune Crime) अल्पवयीन मुलीला लग्नासाठी विचारणी केली. यानंतर मुलीला घरी सोडत म्हणत स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याने ही मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

याबाबत 17 वर्षीय मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ पवार (वय 21, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला.

Chinchwad : सनातनच्या वतीने चिंचवडमधील 4 शाळांना सनातनच्या ग्रंथांचे विनामूल्य वितरण

सोमनाथ पवार व पिडीत मुलीची तोंड ओळख आहे. त्याने मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या सोबत लग्न करशील का? अशी विचारणा केली. तिने नकार दिला. तरीही तिला आपल्या गाडीवर बसवून घरी सोडतो असे सांगून स्वत:च्या घरी नेले.

तसेच, तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध केला. कोणाला काही सांगितले तर जीवे (Pune Crime) मारण्याची धमकी दिली. त्याने वेळोवेळी शारीरीक संबंध केल्याने मुलगी गर्भवती राहिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.