Pune : ‘याच मुलाशी लग्न कर’ म्हणून तगादा लावणाऱ्या वधू-वर सूचक मंडळाच्या संचालिकेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘आम्ही सुचवलेल्या मुलाशीच लग्न कर’ असे सांगून तरुणीवर आणि तिच्या आई-वडिलांवर दबाव टाकणाऱ्या वधू-वर सूचक मंडळाच्या संचालिका आणि एका तरुणाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ वर्षीय तरुणीने याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणीने संबंधित वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवले होते. त्यानंतर संचालिका असलेल्या महिलेने एका तरुणाचे स्थळ आणले आणि ‘याच मुलाशी लग्न कर’ असा तगादा लावला.

फिर्यादी तरुणीच्या कुटुंबीयांनी या स्थळाला नकार दिला होता. परंतु वधू-वर सूचक केंद्राच्या संचालक महिलेने तिच्या आई वडीलांवरही दबाव आणून त्यांना मानसिक त्रास दिला. याचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.