Pune : बेकायदेशीर गावठी दारू बनवणाऱ्या महिलेवर गुन्हा, 6 लाख रुपयांचे रसायन जप्त

एमपीसी न्यूज : गावठी दारु निर्मिती करणाऱ्या (Pune) महिलेवर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.29) पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे लगत मोकळ्या जागेत करण्यात आली. 

याप्रकरणी संबंधीत महिलेविरोधात शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी फिर्याद दिली आहे.

Pune : पुण्यात 2 फेब्रुवारी रोजी ‘ राष्ट्रीय कीर्तन’ कार्यक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला हि बेकायदेशीर रित्या गावठी दारु बनवत होती. यावेळी पोलिसांनी (Pune) छापा टाकून तिच्याकडून 6 लाख रुपयांचे 6 हजार लिटर दारु निर्मीतीचे रसायन जप्त करण्यात आले आहे. याचा पुढील तपास शिरगाव परंदवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.