Pune Crime : लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवले; फोटो व्हिडिओ काढून नातेवाईकांमध्ये व्हायरल केले

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या (Pune Crime) हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाईक असलेल्या तरुणीसोबत एका तरुणाचा विवाह ठरला होता. मात्र, लग्न ठरल्यानंतरही लग्न न करण्याची धमकी देऊन त्याने या तरुणी सोबत शारीरिक संबंध ठेवले. या संपूर्ण प्रकाराचे फोटो, व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून घेतले. त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल करत लग्न करण्यास नकार दिला.

याप्रकरणी सिद्दालिंगाप्पा मल्लाप्पा मादर (वय 29, रा. वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Pune : जेवण मिळाले नाही म्हणून रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी विमाननगर परिसरात राहण्यास असून, सिद्दालिंगाप्पा हा नातेवाईक आहे. त्याचे व तरुणीचे लग्न जमवले होते. यादरम्यान, त्याने वेळोवेळी शारीरीक संबधांची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यावेळी त्याने लग्न न करण्याची धमकी दिली.

ते कर्नाटकातील घरात असताना त्याने शारीरीक संबंध ठेवले. यानंतर पुण्यात आल्यावर येरवड्यातील (Pune Crime) हॉटेलमध्ये नेऊन संबंध ठेवले. त्याचे गुपचूप फोटो आणि व्हिडिओ बनविले होते. त्यानंतर त्याने लग्नास नकार देऊन फोटो व व्हिडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल करुन बदनामी केली. पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.