Thergaon : थेरगाव येथे कोयत्यासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – शस्त्र बाळगल्या (Thergaon) प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (वय 24, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune Crime : लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवले; फोटो व्हिडिओ काढून नातेवाईकांमध्ये व्हायरल केले

थेरगाव (Thergaon) येथील एम एम शाळेजवळ रस्त्याच्या बाजूला एकजण कोयता घेऊन थांबला असून तो गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी रविवारी (दि. 15) सापळा लावून कारवाई करत स्वप्नील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई तुषार काळे यांच्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.