Pune Crime News : आनंदा नगरमध्ये घराचे कुलूप तोडून एकूण 1 लाख 78 हजारांचा ऐवज चोरीस

एमपीसी न्यूज – पुण्यातील सुतारवाडी येथील आनंदा नगरमध्ये घराचे कुलूप तोडून एकूण 1 लाख 78 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) रोजी सकाळी दहा ते साडेपाचदरम्यान घडली.

या प्रकरणी एका महिलेने (वय 31, रा. आनंदा नगर सुतारवाडी) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या फ्लॅटचे कुलूप एका अज्ञात इसमाने तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून 26 हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 78 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चतुःश्रृंगी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.