Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिका लाच प्रकरण; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक, लिपिक, संगणक चालक आणि शिपाई अशा पाच जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 18) पिंपरी चिंचवड महापालिकेत करण्यात आली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, शिपाई अरविंद भीमराव कांबळे, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जाहिरातीचा व्यवसाय करतात. पिंपरी-चिंचवड महापालीकेच्या जागेमध्ये होर्डिंग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या 28 निविदा मंजूर झालेल्या आहेत. परंतु, त्यांची वर्कऑर्डर अद्याप न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले असता वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या 28 निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाऊंट) 3 टक्के रक्कम 10 लाख रूपये लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती 2 टक्के प्रमाणे सहा लाख रुपये घेण्याचे मान्य केले. 6 लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी तयार असलेल्या 6 करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्यासाठी 2 टक्क्याप्रमाणे 1 लाख 18 हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्वीकारली. एसीबीच्या पथकाने सापळा लावून कारवाई केली. पाचही जणांना पोलिसांनी अटक केली.

सर्व आरोपींना गुरुवारी (दि. 19) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.