Pune Crime News : सराईत गुन्हेगार सुमित जगताप याचा खून करुन पसार झालेल्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगार सुमित जगताप याचा शनिवारी (दि.03) रात्रीच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारने हि कारवाई केली.

शबनम हनिफ शेख (रा. भुकनवस्ती, लोहगाव), मोहम्मद हुसेन मोहम्मद शरीफ कुरेशी (रा. लोहगाव) व सलीम मुर्तजा शेख (रा. लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सुमित जगताप याचा शनिवारी (दि.03) खेसे पार्क, लोहगाव येथे रात्रीच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला. या हल्ल्यात शबनम हनिफ शेख हि महिला व तिच्या साथिदरांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले.

महिला आरोपी व तिचे साथीदार शासकीय दूध योजना, खडकी याठिकाणी असून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याठिकाणी अचानकपणे छापा टाकून कारमध्ये बसलेल्या तीघांना ताब्यात घेतले.

मृत सराईत गुन्हेगार सुमित जगताप व महिला आरोपी शबनम शेख यांचे पूर्वीचे भांडण होते. सुमित वारंवार त्रास देत होता म्हणून त्याला मारहाण केली असं शबनम शेखने पोलिसांना सांगितले. सर्व आरोपींना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून, विमानतळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.