Pune Crime News : उद्योजक नानासाहेब गायकवाड यांची मुलगी आणि जावई गजाआड

बंदुकीचा धाक दाखवून जमीन लाटल्याचे प्रकरण :

एमपीसीन्यूज : औंध येथील प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब गायकवाड यांची मुलगी सोनाली दीपक गवारे (वय 40, रा. संभाजी शाळेजवळ, डेक्कन) व जावई दीपक निवृत्ती गवारे (वय 45) यांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपळे सौदागर येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नानासाहेब गायकवाड गणेश गायकवाड यांच्यासह विरोधात चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही उद्योजक नानासाहेब गायकवाड, त्यांचा मुलगा इतर पसार आहेत.

दरम्यान, जावइ व मुलीला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या मुलाने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. या व्याजाच्या पैशाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीची रायगड येथील सात एकर जागा व पिंपळे सौदागर येथील फिर्यादीच्या नावावर असलेली जागा स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी डिसेंबर 2020मध्ये त्यांच्या मुलाला येथील आपल्या राहत्या घरी बोलावले.

त्या ठिकाणी आरोपी नानासाहेब गायकवाड यांनी त्यांच्याजवळ रिवॉल्वरने हवेत गोळीबार करून फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला रिवाल्वर लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच जबरदस्तीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर सह्या व अंगठे घेऊन त्यांना डेक्कन येथील आरोपी सोनाली गवारे हिच्या घरात काही काळ डांबून ठेवत मारहाण केली होती, असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

चतुशृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.