Pune Crime News : शिरूरमध्ये अज्ञाताच्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू, पोलीस घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गाव सकाळी गोळीबाराने हादरले. व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

स्वप्निल छगन रणसिंग (वय 31) असे या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबार झाल्याची माहिती मिळतात ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा गोळीबार नेमका कोणी आणि कशामुळे केला या अद्याप स्पष्ट झाले नाही. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आज सकाळपासून ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अचानक झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण शिरूर तालुका हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील आरोपी व स्वप्नील आहेत. दरम्यान त्यांचा वाळू सप्लायचा भागीदारीत व्यवसाय आहे. मात्र तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाले होते. त्यावरून आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अचानक दोघांनी दुचाकीवर येत स्वप्नीलवर गोळ्या झाडल्या. त्याने दोन गोळ्या झाडल्या. यात स्वप्नील गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींचा मग काढला जात आहे. शिरूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.