Pune Crime News : पुण्याच्या मध्यवर्ती भागातील हॉटेलवर पोलिसांची कारवाई; सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त

एमपीसी न्यूज – शहरातील मध्यवर्ती असलेल्या ‘प्यासा’हॉटेलमध्ये काल रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु असल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज शेट्टी याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी तक्रार दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 नंतर हॉटेल बंद करण्याचे निर्बंध आहेत. मात्र असे असतानाही काल रात्री उशिरापर्यंत हॉटेल प्यासा मध्ये मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांना मिळाली होती.

त्यानुसार विशेष पथकाने हॉटेलवर छापा टाकून सव्वा लाख रूपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. बार व्यतिरिक्त रोडलगत वेगळे काउंटर उभे करून विनापरवाना मद्यविक्री आणि अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु असल्याचे दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.