Chikhali Crime News : पतीच्या बाहेरील प्रेमसंबंधामुळे विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पतीचे परस्त्रीसोबत असलेल्या प्रेमसंबंधावरून पती आणि सासूने मिळून विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्याद एका विवाहितेने चिखली पोलिसात दिली आहे.

पती निलध्वज रामचंद्र माने (वय 34, रा. चिखली) आणि 65 वर्षीय सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती निलध्वज याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे त्याने फिर्यादी विवाहितेला मानसिक त्रास देत मारहाण व शिवीगाळ केली. विवाहितेच्या सासूने देखील विवाहिता चांगली नसल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण व शिवीगाळ करत क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.