Pune : वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणावर वार

एमपीसी न्यूज- शहरात हत्या, मारामा-या, तोडफोडीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढवली. सराईत गुंडांना टार्गेट करत शहरातील वेगवेगळ्या भागात कोंबिंग ऑपरेशन वाढवले. .काही गुंडांना तडीपारही केले. पण असे असतानाही गुन्हेगारी कारवाया काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शहरातील हडपसर आणि ताडीवाला रस्ता परिसरात पुन्हा एकदा हाणामारीच्या घटना उघडकीस आल्या.

हडपसर येथील घटनेत कमलेश झिंगे हा तरुण जखमी झाला. तो मांजरी येथील एका कार्यालयात कामाला आहे. शनिवारी रात्री तो काम करत असताना ऑफीसमध्ये आलेल्या एकाने कमलेशवर कोयत्याने हल्ला चढवला. यात कमलेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हडपसर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

दुसरी घटना ताडीवाला रस्ता परिसरता घडली असून य़ामध्ये अमित वाघमारे हा तरुण जखमी झाला आहे. जामिनावर बाहेर आलेल्या सागर लगाड याने त्याला पूर्ववैमनस्यातून मारहाण केली. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.