Dighi : चाकूचा धाक दाखवून तरुणास लुटले

एमपीसी न्यूज – चाकूचा धाक दाखवून तरुणाकडील 5 हजार 400 रुपये जबरदस्ती काढून घेतले. यावेळी प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या मित्रावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रस्त्यावर घडली.

ओंकार अंकुश रामगंडे (वय 19, रा. ससून हॉस्टेलजवळ, पुणे) यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हृषीकेश हनुमंत गउकर(वय 22), प्रसन्न उर्फ भावड्या मुंगसे ( दोघे रा. देहूफाटा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार हे रात्री मित्रांसोबत जेवण करून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. आरोपींनी ओंकार यांच्याकडील 5 हजार 400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याबाबत ओंकार यांच्या मित्राने जाब विचारला. यावरून चिडलेल्या आरोपी मुंगसे याने ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.