Pune Crime News : कर्जाच्या बहाण्याने ज्येष्ठाला 10 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने जेष्ठ नागरिकाला तब्बल 10 लाखांचा गंडा घातला. ही घटना जून ते सप्टेंबर 2019 मध्ये खडकीतील रेंजहिल परिसरात घडली आहे. याप्रकरणी 63 वर्षीय ज्येष्ठाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी कुटूंबियासह लोहगाव वाघोली रस्ता परिसरात राहायला आहेत. जुन 2019 मध्ये फिर्यादींची ओळख तरूणासोबत झाली होती. त्यानंतर संबंधिताने फिर्यादीला कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फिच्या नावाखाली पैसे घेतले.

तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, तुमचे अर्धे कर्ज माफ होणार आहे, असे सांगून विविध आमिष दाखवून आरोपीने ज्येष्ठाकडून वेळोवेळी मिळून 9 लाख 75 हजार रूपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.