Pune Crime News : एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची पाच लाख रुपयांनी फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने त्यांच्या खात्यातील तब्बल पाच लाख आठ हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली.

वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बँक ऑफ इंडिया मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी काशिनाथ विश्वनाथ ढावरे (वय 61) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाने विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे 25 जानेवारी रोजी वानवडी परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. या वेळी एटीएम मधून पैसे निघत नसल्याने एटीएम मशीन जवळ असणाऱ्या एका व्यक्तीने ‘बाबा तुमचे पैसे निघत नाहीत का ? मी मदत करू का ?” अशी विचारणा करून हातचलाखीने फिर्यादी यांचे एसबीआय चे एटीएम कार्ड काढून घेतले. आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख आठ हजार 115 रुपये काढून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली

वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.