Pune Crime News : गांज्याची विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक;22 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांज्याची विक्री करण्यासाठी पुण्यात येणार्या दोन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 22 किलो गांजा आणि एक स्कार्पिओ कार पोलीसांनी जप्त करुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, दोन जण पुण्यात गांजा विकण्यासाठी येणार आहेत अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यावेऴी गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक गणेश माने यांनी लोणीकंद येथे सापळा रचून दोन जणांना अटक केली. हनुमंत भाऊसाहेब कदम (रा.कुसडगाव, ता.जामखेड,जि. नगर) आणि तुषार संजय झांबरे (रा.हिंगणी ता. आष्टी, बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.या दोघांना प्रथम ताब्यात घेऊन त्यांची तापसणी केली असता त्यांच्याकडे स्कार्पिओ कारमध्ये ठेवलेला 22 किलो गांजा आणि गांजा विक्रीसाठी लागणारे साहित्य तसेच स्कार्पिओ कार जप्त करण्यात आली.

 

बाजारात या गांजाची किंमत चार लाख 50 हजार तर स्कार्पिओ कारची किंमत चार लाख इतकी असून एकूण आठ लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.