Pune Crime : कोकेन बाळगल्याप्रकरणी टांझानियन नागरिकासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पुणे शहर पोलिसांच्या (Pune Crime) गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी कोकेन बाळगल्याप्रकरणी टांझानियन नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली. बेका हमिस फौमी (वय 46) आणि अर्शद अहमद इक्बाल खान (वय 42) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

खान आणि फौमी हे टांझानियन नागरिक असून कोंढवा येथे राहतात. एएनसीच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता.

पोलिसांनी त्यांचे मोबाईल जप्त केले असून त्यांची झडती घेतली असता 36.920 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले; ज्याची किंमत अंदाजे 7,58,600 रुपये आहे.

Today’s Horoscope 21 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.